Marathi digital magazine
मराठी डिजिटल मासिक आणि डिजिटल दिवाळी अंक
तुमचा अंक आम्ही पुण्यात डिझाइन करतो: छापण्यासाठी तयार पीडीएफ, आणि त्याच अंकाची वेब आवृत्ती, जी व्हॉट्सॲपवर एका लिंकने कोणत्याही फोनवर लगेच उघडते.
Marathi digital magazines and digital Diwali ank, designed in Pune: a print-ready PDF and a web edition you can share on WhatsApp.
कोणासाठी
दिवाळी अंक
संस्था, मंडळे आणि प्रकाशकांचे दिवाळी अंक: कथा, कविता, लेख, जाहिराती.
सोसायटी आणि मंडळ
गृहनिर्माण सोसायटी, गणेश मंडळ, ज्ञाती संस्था यांचे वार्षिक अंक.
शाळा आणि महाविद्यालय
वार्षिक अंक, माजी विद्यार्थी अंक, स्मरणिका.
कंपनी आणि बँक
मराठी गृहपत्रिका, सहकारी बँका आणि पतसंस्थांचे वार्षिक अहवाल.
कुटुंब
लग्न, वाढदिवस, षष्ठ्यब्दीपूर्ती: आठवणींचा अंक.
परदेशातील मराठी मंडळे
अमेरिका, इंग्लंड, दुबईतील मराठी मंडळांचे अंक, एका लिंकवर जगभर.
व्हॉट्सॲपवर अंक
आज बहुतेक अंक व्हॉट्सॲपवर फिरतात. पीडीएफ जड असते, उघडायला वेळ लागतो आणि वाचताना सारखे झूम करावे लागते. वेब आवृत्ती म्हणजे एक लिंक: फोनवर लगेच उघडते, अक्षरे फोनच्या आकारात बसतात, फोटो स्पष्ट दिसतात आणि किती जणांनी वाचले ते कळते.
छापील अंक हवा असेल तर तोही मिळतो: छापखान्यासाठी तयार पीडीएफ, योग्य मार्जिन आणि रंगांसह.
नमुने इंग्रजीत आहेत; मराठी अंक त्याच दर्जाने बनतो.
किंमत
- ८ ते १२ पानेवेब आवृत्ती ₹6,000₹8,000 पासून
- १२ ते १६ पानेवेब आवृत्ती ₹6,000₹12,000 पासून
- २४ ते ३२ पानेवेब आवृत्ती समाविष्ट₹20,000 पासून
- ४० ते ६० पानेवेब आवृत्ती समाविष्ट₹35,000 पासून
काम सुरू करण्यापूर्वी लेखी, ठरलेली किंमत. दोन वेळा बदल समाविष्ट. ५० टक्के आधी, उरलेले अंतिम फाइल देण्यापूर्वी.
प्रश्न
- मराठी डिजिटल मासिक म्हणजे काय?
- छापील मासिकासारखेच, पण मोबाईलवर वाचण्यासाठी बनवलेले. एक लिंक व्हॉट्सॲपवर पाठवली की अंक लगेच उघडतो: मजकूर फोनच्या आकारात बसतो, फोटो स्पष्ट दिसतात, व्हिडिओ आणि लिंक चालतात. पीडीएफ डाउनलोड करायची गरज नाही.
- दिवाळी अंक डिजिटल करता येईल का?
- हो. आम्ही दिवाळी अंकाची छापण्यासाठी तयार पीडीएफ आणि त्याच अंकाची वेब आवृत्ती, दोन्ही देतो. वेब आवृत्ती व्हॉट्सॲप, फेसबुक आणि ईमेलवर एका लिंकने पाठवता येते.
- किती खर्च येतो?
- ८ ते १२ पानांचा अंक ₹8,000 पासून, १२ ते १६ पानांचा ₹12,000 पासून आणि २४ ते ३२ पानांचा ₹20,000 पासून. वेब आवृत्ती २४ पानांपेक्षा मोठ्या अंकांमध्ये समाविष्ट आहे; लहान अंकांसाठी ₹6,000. काम सुरू करण्यापूर्वी लेखी, ठरलेली किंमत.
- दिवाळीपर्यंत अंक तयार होईल का?
- पहिले पूर्ण प्रूफ साधारण १० कामकाजाच्या दिवसांत. दिवाळीपूर्वी अंक हवा असेल तर लेख आणि फोटो लवकर पाठवा; आम्ही तारीख आधीच सांगतो, आणि जमणार नसेल तर तसे स्पष्ट सांगतो.
- मजकूर आणि फोटो कोण देणार?
- लेख, कविता, फोटो आणि जाहिराती तुम्ही पाठवा. आम्ही मुद्रितशोधन, मांडणी, मुखपृष्ठ, फोटो सुधारणा आणि जाहिरातींची पाने करतो. मराठी टंक नीट वापरतो, जोडाक्षरे बरोबर दिसतील याची काळजी घेतो.
- किती लोकांनी अंक वाचला ते कळेल का?
- हो. वेब आवृत्तीसोबत छोटा अहवाल मिळतो: किती जणांनी अंक उघडला, कोणते लेख वाचले, किती वेळ वाचला. कुकीज नाहीत, कुणाचे नाव किंवा नंबर गोळा केला जात नाही.
तुमच्या अंकाबद्दल सांगा.
किती पाने, कधी हवा, छापील की डिजिटल. आम्ही किंमत आणि तारीख सांगतो. ईमेल magz@digi.ai.in किंवा व्हॉट्सॲप +91 98605 96905.